चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाचे किशोर जोरगेवार विजयी झालेले आहेत. काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रविण पडवेकर यांना जोरगेवारांनी धूळ चारली. भाजप जोरगेवार यांनी 23 हजार इतक्या विक्रमी मतांनी विजय मिळवला.
. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजप विरुद्ध कांग्रेस अशी लढत आहे. भाजपचे किशोर जोरगेवार यांना 1 लाख 6 हजार 841 तर कांग्रेसचे प्रवीण पडवेकर यांना 84 हजार 37 मते मिळाली. अपक्ष ब्रिजभूषण पाझारे 14 हजार 598, अपक्ष राजू झोडे यांना 5 हजार 711 मते मिळाली. किशोर जोरगेवार 22 हजार 804 मतांनी विजयी झाले.


