Home राजकीय लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घटली

लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घटली

1306

विसापूर येथील १0 मतदान केंद्रावर स्थिती

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ४ टक्के मतदान कमी

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव आहे. यामुळे लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे या गावावर लक्ष केंद्रीत असते. येथे एकूण १0 मतदान केंद्र आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान येथील एकूण ७ हजार ९८3 मतदारांपैकी ५ हजार ७४0 मतदारांनी मताधिकाराचा अधिकार बुधवारी बजावला. ही टक्केवारी ७२ इतकी आहे. मात्र, विसापूर गावात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानांची टक्केवारी घटल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. येथे लोकसभा निवडणुकीत मतदान ७६ टक्के इतके झाले होते. तर बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणूक दरम्यान ही मतदानाची टक्केवारी सरासरी ७२ टक्के इतकी झाली आहे.

.      बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत पंचायत समितीचे एक गण आहे. लोकसभा निवडणुकीत येथील एकूण मतदारांची संख्या ७ हजार २२१ इतकी होती. यांपैकी त्यावेळी ५ हजार ४८९ मतदारांनी मताधिकाराचा अधिकार पार पाडला होता. ही सरासरी ७६ टक्के इतकी होती. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान येथील मतदारांची संख्या ७६२ ने वाढली. बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत येथील एकूण ७ हजार ९८3 मतदारांपैकी ५ हजार ७४0 मतदारांनी मतदान केले. ही यावेळी मतांची टक्केवारी ७२ इतकी ठरली. मात्र, ही टक्केवारी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ४ टक्के मतांनी घटली आहे. ही घटलेली मतदानाची टक्केवारी कोणत्या उमेदवारांच्या पथ्यावर पडणार, हे चित्र शनिवार दिनांक २3 नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल दरम्यान कळणार आहे.

.      विसापूर येथे लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्र क्रमांक १3८ मध्ये १ हजार १ मतांपैकी ७२४, केंद्र क्रमांक १3९ मध्ये १ हजार ६0 पैकी ८0४ , केंद्र क्रमांक १४0 मध्ये ७39 पैकी ६२0 ,केंद्र क्रमांक १४१ मध्ये ४६६ पैकी 30७ ,केंद्र क्रमांक १४२ मध्ये ७3१ पैकी ४७3 ,केंद्र क्रमांक १४3 मध्ये ६४४ पैकी ४0२ ,केंद्र क्रमांक १४४ मध्ये ८४3 पैकी ६२१ ,केंद्र क्रमांक १४५ मध्ये ६७५ पैकी ४७१,केंद्र क्रमांक १४६ मध्ये १0६२ पैकी ८१3 ,तर मतदान केंद्र क्रमांक १४७ मध्ये ४८१ पैकी २५४ असे मतदान झाले होते. ही लोकसभा निवडणुकीत टक्केवारी ७६ इतकी होती.

विसापुरात विधानसभेत असे झाले मतदान                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     विसापूर येथे लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणूक दरम्यान ७६२ मते वाढली. येथील मतदानांची टक्केवारी ७२ इतकी आहे. विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्र क्रमांक १४3 मध्ये १0१८ पैकी ७3५ असे मतदान झाले. केंद्र क्रमांक १४४ मध्ये १0७२ पैकी ८१२, केंद्र क्रमांक १४५ मध्ये ७५3 पैकी ६१५, केंद्र क्रमांक १४६ मध्ये ५७८ पैकी १४६, केंद्र क्रमांक १४७ मध्ये ७४५ पैकी ४७3, केंद्र क्रमांक १४८ मध्ये ६५४ पैकी ४१0, केंद क्रमांक मध्ये १४९ मध्ये ८५0 पैकी ६५3, केंद क्रमांक मध्ये १५0 मध्ये ७२४ पैकी ५२७, केंद्र क्रमांक १५१ मध्ये १0९२ पैकी ८४६, तर मतदान केंद्र क्रमांक १५२ मध्ये ४९७ पैकी २८८ असे एकूण ७९८3 पैकी ५७४0 असे मतदान झाले आहे. एकूण २0 उमेदवारांपैकी कोणाच्या पारड्यात अधिक मतदान पडले. हे शनिवार ला उघड होणार आहे.

error: Content is protected !!