Home राजकीय बल्लारपूर मतदार संघातील ६९.७९ टक्के मतदारांचा कौल कोणाला ?

बल्लारपूर मतदार संघातील ६९.७९ टक्के मतदारांचा कौल कोणाला ?

1296

निकाला कडे राज्याचे लक्ष

चुरशीच्या निवडणुकीमुळे उमेदवारांची धाकधूक

अनेकश्वर मेश्राम
  विसापूर : १५ व्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक काल बुधवारी पार पडली. बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील एकूण 3 लक्ष १२ हजार 3५५ मतदारांपैकी 3६६ मतदान केंद्राच्या माध्यमातून २ लक्ष १७ हजार ९७८ मतदारांनी मताधिकाराचा हक्क बजावला. ही टक्केवारी बल्लारपूर विधानसभा मतदार संघाची ६९.७८ इतकी आहे. निवडणुकीत एकूण २0 उमेदवारांनी मतदारांचा कौल मागितला. हा मतदारांचा कौल कोणत्या उमेदवाराला बळ देणार, हे उद्या ( दि. २3 ) रोजी दुपार पर्यंत कळणार आहे.

.       बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील यावर्षी निवडणूक अतिशय अटीतटीच्या सावटात पार पडली. मुख्य लढत महायुतीचे उमेदवार व राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सातव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परिणामी राज्याचे लक्ष येथील निवडणूक निकालाकडे लागले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे ( कांग्रेस ) चे उमेदवार संतोषसिंग रावत यांनी ही लढत लक्षवेधी केल्याचे मतदान प्रक्रिया पार पडल्यावर दिसून येत आहे. यामध्ये अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे ( बेहरे ) व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश मालेकर यांच्या उमेदवारीमुळे मत विभागणी किती प्रमाणात होते. यावर विजयी उमेदवाराचे भविष्य अवलंबून आहे.

.        बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील मूल तालुक्यातील एकूण ९४ हजार २0 मतदारांपैकी १0९ मतदान केंद्राच्या माध्यमातून ७3 हजार ६६९ मतदारांनी मताधिकार बजावला आहे. ही टक्केवारी ७८.3५ इतकी आहे. बल्लारपूर तालुक्यातील १ लक्ष १७ हजार २१६ मतदारांनी १२९ मतदान केंद्रावर ७3 हजार ६७९ मतदारांनी मतदानांची भूमिका पार पाडली. ही एकूण सरासरी टक्केवारी ६२.८६ इतकी आहे.

.      बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा तालुक्यात एकूण ४१ हजार १८ मतदारांपैकी ५0 मतदान केंद्राच्या माध्यमातून 3२ हजार ९६८ मतदारांनी मताधिकार बजावला आहे. येथील मतदानांची टक्केवारी सर्वाधिक असून ते ८0.3७ इतके मतदानाची आहे. चंद्रपूर तालुक्यातील ६0 हजार १0१ मतदारांनी ७८ मतदान केंद्रावरून 3७ हजार ६६२ मतदारांनी मतदान नोंदणी केली आहे. ही टक्केवारी ६२.६६ इतकी आहे. बल्लारपूर विधानसभा मतदार संघत चार तालुक्याचा समावेश असून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय मार्फत मतदानांची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. आता सर्वांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे. बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील ६९.७९ टक्क्यांचे मतदान कोणत्या उमेदवाराला झुकते माप देतात,यासाठी शनिवार ची प्रतिक्षा आहे.

error: Content is protected !!