Home चंद्रपुर जिल्हा विशेष गडचांदुरात ६१ लाखांची रक्कम जप्त

गडचांदुरात ६१ लाखांची रक्कम जप्त

1319

गडचांदूर : राजुरा विधानसभा निवडणुकी दरम्यान मतदारांना आमिष देण्यासाठी ६१ लाखांची रोकड लपवून ठेवली होती. काँग्रेसने तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने रात्री उशिरा गडचांदूर येथील एका संशयित घरावर धाड टाकत ही रक्कम जप्त केली. सदर रक्कम भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांची असल्याची चर्चा आहे.

.     राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीनुसार, संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात बाहेरील महिला – पुरुष व बाऊंसर नेमून मतदारांना पैसे वाटप करण्याचा कट रचला जात असल्याचे समोर आले आहे.

आयोगाची सतर्कता आणि निवडणुकीतील गैरप्रकार उघड                                                                                                              निवडणूक आयोगाच्या टीमने रात्रभर तपास करून ही मोठी कारवाई केली. जप्त केलेली रक्कम निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आली असून, या घटनेने निवडणुकीच्या निष्पक्षतेवर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

इतका पैसा येतो कुठून?                                                                                                                                                                 भाजप उमेदवाराकडून सापडलेल्या मोठ्या रकमेने विरोधी पक्षांना आक्रमक बनवले आहे. “इतका मोठा पैसा कुठून आला? असा सवाल विरोधकांकडून विचारले जात आहेत.

error: Content is protected !!