दारू आणि पैसे वाटपाचा आरोप
गांधी चौकात तणाव
चंद्रपूर : मूल शहरातील काँग्रेस भवनात दारु आणि पैसे वाटप होत असल्याची तक्रार भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांकडे प्राप्त झाल्याने बुधवारी पोलिसांनी काँग्रेस भवनावर धाड टाकली. या कारवाईत विजय चिमड्यालवार यांना ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चिमड्यालवार महिलांना काँग्रेस भवनात बोलावून दारु व पैसे वाटप करत असल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गांधी चौकात एकत्र येत विरोध दर्शवला. यामध्ये भाजपा नेत्या सपना मुनगंटीवार आणि शलाका मुनगंटीवार यांनी देखील काँग्रेस भवनात जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
. घटनास्थळी पोलीस पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. गांधी चौकात मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केला आणि गर्दी पांगवली. यावेळी दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली, मात्र पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून मोठा अनुचित प्रकार टाळला.


