Home चंद्रपुर जिल्हा विशेष विसापूर येथे पोकलंड मशीन व दोन हायवा ट्रक जप्त

विसापूर येथे पोकलंड मशीन व दोन हायवा ट्रक जप्त

1315

बल्लारपूर तहसील प्रशासनाची कारवाई

विना परवानगी अवैध उत्खनन प्रकरण

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर हद्दीत एका शेताजवळ पोकलंड मशीनच्या माध्यमातून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन केले जात होते. याची माहिती तहसील प्रशासनाला झाली. तहसील प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अवैधरित्या उत्खनन करणारी पोकलंड मशीन व दोन हायवा ट्रक जप्त केले. ही कारवाई बल्लारपूर तहसील प्रशासनाने सोमवारी केली.

.      बल्लारपूर तालुक्यातील विसापूर शेतशिवारात भुखंड क्रमांक 433/1 मध्ये पोकलंड मशीनच्या माध्यमातून मातीचे अवैध उत्खनन केले. गौण खनिजाचे उत्खनन करून ते दोन हायवा ट्रक मध्ये भरून वाहतूक करत होते. तहसील प्रशासनाच्या अधिकार्यांनी त्यांच्या कडे गौण खनिजाचे उत्खनन प्रकरणी परवाना मागितला. मात्र, त्यांकडे कोणत्याही प्रकारचे परवानगी मिळून आली नाही. याप्रकरणी तहसील प्रशासनाने अवैध गौण खनिजाच्या उत्खननात वापरण्यात आलेले पोकलंड मशीन व दोन हायवा ट्रक जप्त करून तहसील कार्यालयात जमा केले.

.      विसापूर परिसरातील भिवकुंड येथील भुखंड क्रमांक 433/1 मध्ये 30× 40× 15 खोलवर मातीचे उत्खनन केल्याप्रकरणी पोकलंड मशीन आणि हायवा ट्रक क्रमांक ( एम.एच.12 / व्ही.टी.5911 ) व ( एम.एच. 12/ आर.एन.5808 ) जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सदर अवैध गौण खनिजाचे उत्खनन सोनाई इन्फास्टक्कर्चर प्रा.लि. सांगली मार्फत केले जात असल्याची माहिती आहे. मात्र, ज्या शेतकऱ्याचा शेतजमीन मधून मातीचे उत्खनन केले जात आहे. तो शेतकरी कारवाई दरम्यान हजर नसल्याने शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत अवैध मातीचे उत्खनन करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक प्रमोद भोसले यांनी माती उत्खनन करण्यात परवानगी तहसील प्रशासनाकडे मागितल्याचे म्हटले आहे. यामुळे जप्तीची कारवाई बाबत शंका निर्माण झाली आहे. ही कारवाई तहसीलदार अभय गायकवाड यांच्या माध्यमातून मंडळ अधिकारी किशोर नवले व तलाठी ए.एन.नौकरकर यांच्या पथकाने केली.

शेतातून माती उत्खनन व वाहतुकीला शेतकऱ्यांचा विरोध                                                                                                                      विसापूर गावाच्या हद्दीतील भिवकुंड परिसरात एका शेतकऱ्याचा शेतजमीन मधून मातीचे उत्खनन केले जात आहे. मात्र, लगतच्या शेतकऱ्यांचे शेत पिकांचे मातीच्या वाहतुकीमुळे नुकसान होत आहे. कापूस, सोयाबीन व अन्य पिके माती वाहतुकीच्या धुळीने काळवंडल्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. मातीच्या वाहतुकीला शेतकऱ्यांचा विरोध आहे. लगतच्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळावी. त्यानंतर तहसील प्रशासनाने माती उत्खनन करण्यासाठी परवानगी द्यावी, असी मागणी लगतच्या सात च्या संख्येतील शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे मौका पंचनामा करताना केल्याची माहिती आहे. यामुळे भुखंड क्रमांक ४33/१ मधील माती उत्खनन प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यावर तहसील प्रशासन काय मार्ग काढते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!