Home सामाजिक उखर्डा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

उखर्डा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

1548

वरोरा : हेल्पएज इंडीया वरोरा आणि GMR कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरातालुक्यातील उखर्डा येथे अभिजीत कुडे मित्र परिवार यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. यात 96 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

.     या शिबिराची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. गावातील जेष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी नेहमी व्हावी या साठी ही संस्था अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्यांचे कार्याचे कौतुक केले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर निरोगी असणे खूप गरजेचे आहे. जे पैसे कमवण्यासाठी आरोग्य गमावतात, त्यांना नंतर आरोग्यासाठी पैसा गमवावा लागतो. तुम्ही पैशाने महागडी औषधे विकत घेऊ शकता पण चांगले आरोग्य कधीच विकत घेऊ शकत नाही” असे प्रतिपादन अभिजित कुडे यांनी केले. या शिबिरात ताप, सर्दी, खोकला, खाज सुटणे, बीपी, शुगर तसेच अस्थमा या आजाराची औषध मोफत देण्यात आली.

.     या शिबिराला रशेदा शेख, डॉ. संदीप नरवडे, वैभव देठे, संदीप काळे यांची वैद्यकीय चमू होती तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून कल्याणी कुडे (पोलिस पाटील) या उपस्थित होत्या. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विजय कुडे, रोशन भोयर, विनोद कोठारे, रणजित हीवरकर, प्रतीक कुडे यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!