मुदतीपूर्वी कार्यालय गुडांळल्याने चर्चा
विसापूर येथे पहिल्यांदा घडला दडपशाहीचा प्रकार
विसापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. प्रचाराची रणधुमाळी अवघ्या काही तासात संपुष्टात येत आहे. मात्र, विसापूर येथे रविवारी विपरीत घडले. मुदतीपूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत यांचे निवडणूक प्रचार कार्यालय बंद करण्यात आले. या चर्चेने गावात उधान आले आहे. दडपशाहीच्या राजकारणाचा पहिल्यांदा प्रकार बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे घडला.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे निवडणूक दरम्यान नेहमी सामाजिक सौहार्दाचे वातावरण राहिले आहे. गावात ८ हजार पेक्षा अधिक मतदारांची संख्या आहे. या मतावर डोळा ठेवून राजकीय पक्ष गावावर लक्ष केंद्रीत केले आहे. मतदान अधिक पडावे, हाच हेतू उमदवारांचा आहे. मात्र, यावेळी गावात निवडणूक दरम्यान नवीन पायंडा पडल्याचा प्रकार घडला आहे.
. बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे कांग्रेसचे उमेदवार संतोष यांचे निवडणूक प्रचार कार्यालय स्थानिक कांग्रेसचे अध्यक्ष वामन गौरकार यांच्या एका खोलीत उघडण्यात आले होते. समोर मंडप आच्छादन होते. विशेष म्हणजे काल शनिवार ला कांग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांची निवडणूक प्रचार सभा पार पडली. कदाचित प्रचार सभेचा प्रतिसाद बघून विरोधकांचे धाबे दणाणले की काय ? म्हणून प्रचार कार्यालय गुडांळण्याची दडपशाही करण्यात आल्याची चर्चेला पेव फुटले आहे. विशेष म्हणजे वामन गौरकार यांना प्रचार कार्यालय गुंडाळताना डोळ्यात अश्रू आले. हा प्रकार पाहून यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत दडपशाहीच्या राजकारणाचा शिरकाव गावात सुरू झाल्याच्या चर्चेला बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.
. लोकशाहीचा उत्सव म्हणजे सार्वत्रिक निवडणूक आहे. लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदानातून मतदार आपला प्रतिनिधी मतदार निवडतात. मात्र, अलीकडेच राजकारण लयास जाताना दिसत आहे. निवडून येण्यासाठी दडपशाहीचा मार्ग अवलंबला जात असल्याची प्रचिती विसापूर येथील प्रकारावरून आली आहे.
” आम्ही निवडणूक प्रचार कार्यालयासाठी खोली भाड्याने घेतली. त्यासाठी आवश्यक परवानग्या देखील घेतल्या. आमचे कार्यालय सोमवार (दि. १८) रोजी सायंकाळी ५ वाजता बंद करण्यात येणार होते. मात्र, रविवारी च कार्यालय बंद करण्याचे दडपण अज्ञाताने घर मालकाला दिल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत यांचे विसापूर येथील निवडणूक प्रचार कार्यालय मुदतीपूर्वी बंद करण्याची वेळ आली. बंडू गिरडकर, माजी सरपंच तथा निवडणूक प्रमुख महाविकास आघाडी, विसापूर


