Home राजकीय कांग्रेसच्या गॅरंटी मतदारांच्या जीवनात बदल घडविणार

कांग्रेसच्या गॅरंटी मतदारांच्या जीवनात बदल घडविणार

1325

संतोष सिंग रावत यांचे प्रतिपादन

विसापूर येथे पार पडली निवडणूक प्रचार सभा

विसापूर : राज्यातील महायुतीच्या सरकारने जनतेच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. विधानसभा निवडणूक राज्याच्या अस्मितेची आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या महायुतीला हद्दपार करा. तीस वर्षापासून या भागात भाजपाचे लोकप्रतिनिधी आहे. मात्र, त्यांनी बेरोजगारी दूर करण्यासाठी काहीच केले नाही. आता आपल्याला परिवर्तन घडविण्याची संधी आहे. त्यांच्या धमकीला न घाबरता, कांग्रेसला विजयी करा. कांग्रेसची पाच गॅरंटी मतदारांच्या जीवनात बदल घडविणार आहेत, असे प्रतिपादन बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंग रावत यांनी विसापूर येथे केले.

.       महाविकास आघाडीच्या वतीने विसापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा शनिवार ला पार पडली. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधताना संतोष सिंग रावत म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांग्रेस पार्टी ने महिलांच्या जीवनात उन्नती करण्यासाठी तीन हजार रुपये दरमहा देण्याची गॅरंटी दिली आहे. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून तीन लक्ष रुपये कर्ज माफ करणार आहे. बेरोजगारीचा प्रश्न लक्षात घेवून तरूणांना रोजगार मिळे पर्यंत चार हजार रुपये दर महिन्याला देण्याचे वचन दिले आहे. सर्वसामान्य माणसांचा विचार करणारे २५ लक्ष रुपये किंमतीचा आरोग्य विमा प्रदान करण्याचा संकल्प केला आहे. यासह अन्य गॅरंटी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहेत. मतदारांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत देणाऱ्या आहे. यामुळे महागाईच्या काळात दिलासा मिळणार असून माणसांच्या जीवनात सुख सुविधा निर्माण करणाऱ्या आहे, असे त्यांनी सांगितले.

.      यावेळी मंचावर बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंग रावत, सामाजिक कार्यकर्ते चंदू मारकवार, कांग्रेस पार्टीचे नेता घनश्याम मुलचंदानी, शिवसेना (उबाठा) चे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे, डॉ. विश्वास झाडे, अनिल वाग्दरकर, शफी गुरूजी, डॉ. संजय घाटे, कृउबाचे माजी सभापती दिनेश चोखारे, माजी सरपंच संध्या पेंदोर, गोविंदा उपरे, ग्रामपंचायतीच्या सदस्य शारदा डाहुले, हर्षदा टोंगे, सरोज केकती, माजी उपसरपंच श्याम वैद्य, सुरेश पुणेकर, भूपाल बोरकर आदींची उपस्थिती होती. सभेचे संचालन माजी सरपंच बंडू गिरडकर यांनी केले. यावेळी सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

error: Content is protected !!