Home चंद्रपुर जिल्हा विशेष पेट्रोलिंग करताना तीन लाखाची रक्कम जप्त

पेट्रोलिंग करताना तीन लाखाची रक्कम जप्त

1305

वरोरा गुन्हे शोध पथकाची कारवाई

12 लाखाचा मुद्देमाल जप्त

वरोरा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरोरा शहर परिसरात निवडणूक आयोगाची भरारी पथके आणि पोलीस विभागाकडून संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. अशाच वाहन तपासणीच्यावेळी पेट्रोलिंगवर असलेल्या गुन्हे शोध पथक वरोरा च्या पथकाला यात्रा वार्ड वरोरा येथे बुद्ध भुमी समोरील रोडवर महीद्रा कंम्पनीची बोलोरो चार चाकी वाहन क्र. एम.एच.34-सी.जे.-3175 मध्ये रोख रक्कम घेऊन जाणारे वाहन आढळले. पोलिसांंनी या वाहनाची तपासणी केली. त्यात 3,लाख 28, हजार 820 रूपये आढळले. या रकमेबाबत वाहन चालकासह संबधित योग्य ते पुरावे आणि खात्रीलायक माहिती देऊ शकले नाहीत त्यामुळे हे वाहन भरारी पथकाने रोख रकमेसह ताब्यात घेतले.

.       पोलीस सूत्रानुसार दि. 15 रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास गुन्हे शोध पथकाची चमू वरोरा शहरामध्ये कोबींग ऑपरेशन रात्री दरम्यान यात्रा वार्ड वरोरा परीसरात गुन्हेगार चेक पेट्रोलींग करीत असतांना यात्रा वार्ड वरोरा येथे बुद्ध भुमी समोरील रोडवर महीद्रा कंम्पनीची बोलोरो चार चाकी वाहन क्र. एम.एच.34-सी.जे.-3175 संक्षयास्पद मिळुन आली त्यामध्ये चालक व इतर ईसम मिळुन आल्याने त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता वाहन चालकाने आपले नाव आशीश रमेश मिठपल्लीवार वय 21 वर्ष राह. बोर्डा वार्ड न.-2 वरोरा, तर बाजुला गाडीत बसुन असनारा दारासींग संगतसींग दुधानी वय 28 वर्ष राह. काँलरी वार्ड वरोरा असे मिळुन आले.

.       सदर ईसमाची व बोलोरो वाहनाची झडती घेतली असता सदर बोलोरो वाहनात एका कापडी पिशवित एकुन नगदी रोख रक्कम 3 लाख 28, हजार 820 रुपये व बोलोरो गाडी किमत अंदाजे 9 लाख रुपये असा एकुन किमत 12 लाख 28 हजार 820 रुपया चा माल मिळुन आला नमुद दोन्ही ईसमांना त्याच्या ताब्यातील वाहनामध्ये मिळुन आलेल्या पैश्या बाबत विचारपुस केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही सदर पैश्या बाबत कोणतेही वैद्य कागदपत्रे नसल्याचे सांगीतले. नमुद ईशमांनी सदर पैसे हे विधानसभा निवडनुक सबंधाने वाहतुक करीत असल्याचा संक्षय आल्याने नमुद दोन्ही ईसमांना वाहन व पैश्यासह ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करीता निवडनुक भरारी पथक वरोरा यांना सुचना देवुन पुढील कार्यवाही साठी सादर करण्यात आले.

.       सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोनी साटम तसेच ठाणेदार अजिंक्य तांबडे पोलीस स्टेशन वरोरा यांचे मार्गदर्शना खाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दीपक ठाकरे , पो. स्टॉप पोहवा दिलीप सुर पोअ. महेश गावतुरे, पोअ संदिप मुळे पोलीस स्टेशन वरोरा यांनी केली.

error: Content is protected !!