Home चंद्रपुर जिल्हा विशेष विसापुरातील दिव्यांग मुलाचे पितृछत्र हरवले

विसापुरातील दिव्यांग मुलाचे पितृछत्र हरवले

1305

विसापूर : जन्मजात तो दिव्यांग आहे. त्याच्या मातृत्वाचा आधार दीड दोन वर्षापूर्वीच हरवला. पिताच त्याचा एकमेव आधार होता. मात्र, नियतीने डाव साधला. त्याला आजाराने घेरले. आजारपण वाढले. याच आजारात त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने विसापुरातील ‘त्या’ दिव्यांग मुलाचे पितृछत्र हरविल्याने समाजमन हळहळले. ‘त्या’ दिव्यांग मुलाच्या पित्याचे राकेश नामदेव खंडाळे (४४) रा. वार्ड क्रमांक 3 विसापूर असे नाव असून त्याच्या पार्थिवावर मंगळवार ला विसापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

.      राकेशच्या पत्नीचे दीड वर्षापूर्वी निधन झाले. तेव्हा पासून राकेश हाच दिव्यांग मुलाचा सांभाळ करत होता. त्याची म्हातारी आई व दिव्यांग मुलगा हेच कुटुंब आहे. अशातच राकेशचा आजार दिवसेंदिवस वाढत होता. दिव्यांग मुलाचे संगोपन आजारपणात करण्यासाठी त्याला कसरत करावी लागत होती. या दरम्यान त्याची प्रकृती खालावली. यातच राकेशचे सोमवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान निधन झाले. दीड वर्षापूर्वी दिव्यांग मुलाची आई मरण पावली. आता मात्र, त्याचे पितृछत्र हरवले. त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी म्हाताऱ्या आजीवर आली. त्याचे पितृछत्र हरवले. यामुळे समाजमन हळहळले.

error: Content is protected !!