Home चंद्रपुर जिल्हा विशेष तुर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव

तुर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव

1318

शेतकरी चिंतेत

वरोरा : सध्या होत असलेल्या वातावरणाच्या बदलामुळे फुलावर आलेल्या तुर पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसूत येत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

.      पोषक वातावरणामुळे तुरीचे पीक बहरले आहे. वातावरणातील बदलामुळे बहरलेल्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी सध्या तुरीवर फवारणी कोणती करायची या विचारात असून कृषी केंद्रात धाव घेत औषधाची विचारणा करीत आहे. चिंतेत सापडलेल्या शेतकर्‍याला कृषी विभागाकडून मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे.

.      चंद्रपूर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, धान, तुर या पिकांचा मोठ्या प्रमाणात पेरा केला जातो. कापूस पिकसोबत शेतकरी तुरीचे पीक घेतात. पोषक वातावरणामुळे तुरीचे पीक बहरले असले तरी अळीने आक्रमण केल्याचे दिसून येत आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. शेवटी शेवटी येलो मोझ्याक रोगाने अतिक्रमण केले होते. मात्र, सोयाबीनचा दाणा तयार झाला होता. त्यामुळे येलो मोझ्याक रोगाचा फारसा परिणाम झाला नाही. सोयाबीन पीक काढल्यानंतर त्याच जागेवर रब्बी हंगामात चण्याची लागवड केली.  सुरुवातीपासूनच निसर्गाच्या प्रकोपाने उत्पादनात मोठी घट झाली. शेतकऱ्यांना लागवडीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. धान पीक निघाल्यानंतर आता पोषक वातावरणामुळे तुरीचे पीक बहरले आहे. कापूस पिकामध्ये पेरलेल्या तुरीच्या ओळीवरच आता शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त आहे. परिणामी ऐन हंगामातच बळीराजावर पुन्हा नैसर्गिक संकट कोसळले आहे. यामुळे तुरीचे पीक कमी येणार याची शक्यताही शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!