४५ संघातून शिवणीचा संघ ठरला अव्वल
सिंदेवाही : सध्या गावागावात कबड्डीचा खेळ प्रचलित झाला असला तरी मागील १७ वर्षापासून वासेरा येथे बलिप्रतिपदा निमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्यातील एकूण 43 कबड्डी संघानी सहभाग नोंदविला असून शिवणी येथील जय बजरंग क्रीडा मंडळाचा संघ अव्वल ठरला आहे.
. वासेरा येथील ग्रामस्थांच्या वतीने मागील १७ वर्षापासून गोवर्धन पूजेच्या दिवशी कबड्डी स्पर्धा घेण्यात येत आहे. ही परंपरा कायम जोपासत यावर्षी सुद्धा सोना मेश्राम यांचे आवारात तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातून एकूण 43 कबड्डी संघानी भाग घेतला होता. शिवणी येथील जय बजरंग कबड्डी मंडळ अव्वलस्थानी ठरला, तर वासेरा येथील जय बजरंग कबड्डी क्लब चा संघ दुसरा, आणि चिखली येथील श्री हनुमान क्रीडा मंडळाचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला. अनुक्रमे पहिला, दुसरा, आणि तिसऱ्या क्रमांकाना रोख बक्षीस, आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेच्या आयोजनासाठी पोलीस पाटील देवेंद्र तलांडे यांचे नेतृत्वात समस्त ग्राम वासीयांनी सहकार्य केले आहे. तसेच गावातील रामनवमी उत्सव समिती, बौद्ध समाज नगर कमेटी, संत पाचलेगावकर महाराज समिती, गुरुदेव सेवा मंडळ समिती, पाचलेगावाकर महाराज गणेश मंडळ, वाल्मिकी उत्सव समिती यासारख्या समित्यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. स्पर्धेचे पंच म्हणून राकेश झोडे यांनी विशेष सहकार्य दिले.
. निर्णायक समिती म्हणून सरपंच दिलीप मेश्राम, उपसरपंच महेश बोरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय कापकर, राजू नंदनवार, हेमंत मस्के, ताराकांत बोरकर, महेंद्र कोवले, मंगेश बनसोड, नागेश बंडीवार, सिद्धांत बंडीवार, यांनी काम पाहिले, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय बजरंग क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू यांनी अथक परिश्रम घेतले आहे.


