महावितरणने वाढवली मुदत
व्याज आकारातून मिळणार सवलत
चंद्रपूर : थकीत बिलामुळे वीजपुरवठा पुरवठा कायमस्वरुपी खंडित असलेल्या ग्राहकांसाठी महावितरणने व्याज व विलंब आकारात सूट देणारी ‘अभय योजना’ सुरू केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ ३० दिवस शिल्लक आहेत. थकबाकीतून मुक्त होण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. जिल्ह्यात केवळ ७१३ ग्राहकांनी योजनेत सहभाग घेतला आहे.
. १ सप्टेंबर २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेत विदर्भात १४ हजार ११३ ग्राहकांनी सहभागी होण्याची इच्छा दर्शविली. त्यापैकी १२ हजार १०३ ग्राहक १२ कोटी ९४ लाखांचा भरणा करून योजनेत लाभ घेणाऱ्या ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी ग्राहकांनी थकीत बिलाचा भरणा एकरकमी केल्यास लघुदाब ग्राहकांना १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सवलत मिळते. मूळ देयकाच्या ३० टक्के रक्कम भरून उरलेली रक्कम सहा हप्त्यांत भरता येते. योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी मिळते. कृषी ग्राहक वगळता इतर वीज ग्राहकांना योजना लागू आहे. थकबाकीपोटी जागेची मालकी बदलली तरी थकबाकी भरणे अनिवार्य आहे. ही थकबाकी जागेचे नवीन मालक किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार महावितरणला आहे. सहभागी झाले आहेत. त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ७१३ ग्राहकांनी योजनेत सहभाग घेतला. काही ग्राहकांनी नवीन वीजजोडणी घेण्याची इच्छा जाहीर केली. काहींनी एकरकमी भरणा करणे पसंत केले तर काहींनी ३० टक्के रक्कम भरून बाकी सहा हप्त्यांत भरण्याचा पर्याय निवडला. महावितरणने वीज ग्राहकांसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेत बिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झालेल्या ग्राहकांना देयकाची मूळ रक्कम भरल्यास व्याज व विलंब आकार माफ केला जात आहे.


