Home चंद्रपुर जिल्हा विशेष शेतातील बंड्यात असलेल्या अवैध दारू साठ्यावर छाप

शेतातील बंड्यात असलेल्या अवैध दारू साठ्यावर छाप

1320

दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

वरोरा पोलिसांची यशस्वी कामगिरी

वरोरा : सद्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. पोलीस प्रशासन प्रशासकीय कामात व्यस्त आहे. याचाच फायदा घेत ग्रामीण भागात दारू तस्करांनी डोके वर काढले आहे. वरोरा तालुक्यातील मुरदगाव शेत शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातील बंड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकत अवैधरित्या साठवणूक केलेल्या देशी दारूचा साठा व मोपेड दुचाकी असा 2 लाख 76 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. शेतातील बंड्यात जाऊन वरोरा पोलिसांनी कारवाई केल्याने अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्या दारू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

.      जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम व दिवाळी सण, गुरुनानक जयंती असल्याने 1 नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951चे कलम 37 (1)(3) लागू करण्यात आले आहे. सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही अवैध व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेचा फायदा घेताना दिसत आहे.

.      उपविभागिय पोलीस अधिकारी नयोमी साटम, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टॉफ
सहाय्यक पोलीस निरीक्षक मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक दिपक ठाकरे, पोलीस अंमलदार महेश गावतुरे, पोलीस अंमलदार विशाल राजुरकर, पोलीस अंमलदार मनोज ठाकरे यांनी मिळालेल्या गुप्त बातमी दारांचे खबरेवरुन मौजा मुरदगाव शेत शिवारातील बोंन्डे रा. नागपुर यांचे शेत जे प्रशांत झाडे रा. नागरी याने ठेक्याने केले आहे. त्या शेतातील बंड्यामध्ये देशी दारू साठवुन विक्री करीत आहे. अश्या माहिती वरून, वरोरा पोलिसांनी छापा टाकला असता, मुरदगाव शेत शिवारातील बोन्डेयांचे शेतातील बंड्या समोर एक टी.व्ही.एस. कंम्पनीची मोपेड दुचाकी क्र. MH-34-CH-7572 चे मध्यभागी पायदानावर देशी दारू ने भरलेले चार खरड्याचे खोके दिसुन आले.

.      सदर ठिकाणी उभ्या असलेल्या इसमास पोलीसांनी झडती घेतली परत त्याचे ठेक्याचे शेतातील बंड्यांची पाहणी केली असता, प्रशांत योगराज झाडे वय ३९ वर्ष रा. नागरी ता. वरोरा जि. चंद्रपुर यांच्या बंड्याच्या आतमध्ये ३५ नग खरड्याचे खोक्यात व त्याचे ताब्यातील मोपेड गाडी वरील ४ नग खरड्याचे खोक्यात असा एकुण ३९ नग खरड्याचे खोक्यामध्ये एकुण ३,९०० नग सिलबंद प्लास्टिक बॉटल दारूचा साठा आढळून आला असून किंमत १,५६,०००/- रू. चा देशी दारूचा माल अवैद्यरित्या विक्री करण्याचे उद्देशाने, विना पास-परवाना बाळगुन मिळुन आला.

error: Content is protected !!