Home चंद्रपुर जिल्हा विशेष हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मजुराचा तलावात आढळला मृतदेह

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मजुराचा तलावात आढळला मृतदेह

1402

चिमूर येथील घटना

चिमूर : येथील हॉटेल बालाजी मध्ये कामावर असलेल्या युवकाचा मृतदेह हॉटेल च्या मागच्या परिसरातील बालाजी सागर तलावात रविवारी सकाळी.१०. वाजताच्या सुमारास तरंगताना आढलून आला .अतुल आनंदराव कुमरे असे मृतक युवकांचे नाव आहे.

.     प्राप्त माहिती नुसार सावली तालुक्यातील हेटी येथील अतुल आनंदराव कुमरे हा युवक पंधरा दिवसापूर्वी चिमूर येथील बालाजी हॉटेल येथे कामावर रुजू झाला होता.पण अचानक रविवारी त्याचा मृतदेह हॉटेल मागील परिसरात असलेल्या बालाजी सागर तलावात तरंगताना दिसून आला. ही घटना उघडकीस येताच या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

.     घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला.आकस्मिक मृत्यूची नोंद करून त्याचे शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णायात दाखल केले असून पुढील तपास ठाणेदार संतोष बाकल यांचे मार्गर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ताळीकोटे, पोलीस शिपाई पंडित व चिमूर पोलिसांची चमू करीत आहे.

error: Content is protected !!