एकाच दिवशी ८ तालुक्यातील ६० विहारात वर्षावास समापन
सिंदेवाही : आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमपर्यत चालणाऱ्या वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे समापनाचा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्व अंतर्गत एकाच दिवशी ८ तालुक्यातील ६० बुद्ध विहारात आयोजित करण्यात आला असून सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथे सुद्धा वर्षावास प्रवचन मालिकेचा समारोप करण्यात आला.
. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्व चे जिल्हाध्यक्ष डॉ राजपाल खोब्रागडे, तर मुख्य मार्गदर्शक जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग रमेश मानकर, सिंदेवाही तालुकाध्यक्ष अंबादास कोसे, सरचिटणीस उषाताई दुर्गे, सरचिटणीस केशव दुर्गे, जिल्हा कोषाध्यक्ष मिनाक्षी बारसागडे उपाध्यक्षा सरलाताई रंगारी, महिला तालुकाध्यक्षा शुभांगी खोब्रागडे शहर अध्यक्ष संगिता खोब्रागडे, सरचिटणीस प्राजक्ता खोब्रागडे, संस्कार विभाग सचिव मुन्ना बारसागडे, उपाध्यक्षा रीता पोपटे, तालुका संघटक शांताबाई पाझारे, हिशोब तपासनीस नलुताई रामटेके, सुलोचना रामटेके, मिनाताई बेदले, विशाखा पाटील, मंदाताई भैसारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक अंबादास कोसे यांनी केले तर मुख्य मार्गदर्शक रमेश मानकर यांनी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन आणि समापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले, डॉ राजपाल खोब्रागडे यांनी जिल्ह्यात चाललेल्या वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन आणि नियोजन कशा प्रकारे करण्यात आले व धम्म कशा प्रकारे समजावून सांगितले असे उपस्थितांना सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास कोसे यांनी केले तर उपस्थिताचे आभार मुन्ना बारसागडे यांनी मानले.
. दरम्यान जिल्ह्यातील ८ तालुक्यात एकाच दिवशी ६० बुद्धविहार मध्ये वर्षावास प्रवचन मालिकेचे समापन करण्यात आले असून यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, तालुक्याचे संपूर्ण पदाधिकारी, शहरातील, नगरातील, ग्राम पदाधिकारी , समता सैनिक दलातील सैनिक, बौद्धाचार्य, श्रमानेर, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्ध समाजाचे अध्यक्ष, रमाई महिला मंडळाच्या महिला, यांचे वतीने आपापल्या बौद्ध विहारात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्व चे जिल्हाध्यक्ष डॉ राजपाल खोब्रागडे, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा विजया रामटेके, जिल्हा सरचिटणीस लोमेश खोब्रागडे, कोषाध्यक्ष घनश्याम भडके, मीनाक्षी बारसागडे, उपाध्यक्ष रमेश मानकर, अशोक रामटेके, प्रा.जगदीश सेमसकर , शहराध्यक्ष जी.एम. बांबोळे, मेजर अनिल मेश्राम, सोनाली गजभिये, एन . आर. कांबळे, यांनी दिलेल्या विषयानुसार नियोजन करण्यात आले.


