संताजी नगर येथील घटना
भद्रावती : घरातील व्यक्ती गाढ झोपेत असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील बॅग मधील 50 हजार रुपये लांबविले. व कपाटातील साहित्याची नासधूस केल्याची घटना भद्रावती शहरातील संताजी नगर येथे रविवारी पहाटे 6 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. असून अज्ञात चोरट्याविरुद्ध भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
. प्राप्त माहिती नुसार भद्रावती शहरातील संताजी नगर येथील अमोल वरभे यांच्या घरी रफिक हुसेन शेख हे किरायाणे राहतात. रफिक शेख यांचे कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला व बैग मधील 50 हजारा ची रोख रक्कम लांबवली. त्यानंतर चोरट्यांनी आलमारीतील सामान काही वस्तू मिळेल या आशेने अस्ताव्यस्त केले मात्र अन्य वस्तू त्यांच्या हाती लागल्या नाही.. याबाबत भद्रावती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
. भद्रावती पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून श्वानपथक व फॉर्रेंन्सीक पथकाच्या मदतीने भद्रावती पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे. सदर घटनेचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे.


