Home सामाजिक गोवंश रक्षणासाठी अमोल ठरला अनमोल

गोवंश रक्षणासाठी अमोल ठरला अनमोल

1315

1995 पासून अविरत गोवंशाचे संगोपन

माढेळी व वरोरा येथे गोशाळा

किशोर डुकरे 

 वरोरा : भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या गायींचे व त्यांच्या वंशाचे रक्षण ही काळाची गरज झाली आहे. गायीचे धार्मिक महत्त्व हा वेगळा विषय असला तरी गाय म्हातारी झाली की कसाई ला विकल्या जाते त्यामुळे ग्रामीण भागाची मूळ ओळख असलेला गोवंश आता नामशेष होत आहे.  मात्र वरोरा शहरातील एका युवा उद्योजकाने 1995 पासून गोमातेच रक्षण व तिचे संगोपन करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे.

.     वरोरा शहरातील पारस अग्रो लिमिटेड चे संस्थापक अमोल मुथा यांनी 29 वर्षांपूर्वी वरोरा तालुक्यातील माढेळी येथे गोशाळा सुरू केली. त्यानंतर 2018 मध्ये वरोरा येथे गो शाळेची स्थापना केली या दोन्ही गो शाळेत आज ४०० पेक्षा  अधिक गायी आहेत. त्यांचे संगोपन केले जात आहे. कसायांच्या तावडीतून किंवा कसाई ला गायी विकणाऱ्या पासून गायी सोडविल्या जाण्याचं काम अमोल कडून केल्या जात आहेत. या गायींचे औषधोपचार व अन्य खुराकही नियमितपणे सुरू असतो.

.     वरोरा तालुक्यातील माढेळी येथील रहिवाशी अमोल मुथा यहे नामवंत व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे. त्यांची एक शेतमाल व्यापारी म्हणून तालुक्यात ओळख आहे, मात्र या पलीकडे ही त्यांचे नाव मोठे आहे ते म्हणजे शेकडो गाईचे तारणहार म्हणून, आज राज्य सरकार ने गौ- कत्तल कायदा आणला असून गौ -कत्तल अजूनही सुरु आहे यावर आळा घालण्यासाठी ते शेतमाल व्यवसायासोबतच गोशाला सांभाळत आहे. आज या गोशाला मध्ये शेकडो गाई असून ते या जनावरापासून मिळणारे शेणखत   आपल्याच शेतात वापरतात तर दुध त्यांच्या व्यवसायातील कामगार आणि स्वतः घरी वापर करतात. ही तालुक्यातील एकमेव गोशाला असून ते स्वतः या कडे लक्ष देऊन गायीची काळजी घेत आहे. यामुळे शेतकरी हा गाय कसाई यांना न विकता ते या गोशाला मध्ये आणून देतात, यामुळे “मारणे वाले से बचाने वाले भगवान होते है “म्हणून आज शेकडो गाईच्या रक्षणासाठी ते अमोल पासून अनमोल झाले असे.

पशुपालकांनी कसाईला जनावरे विकू नये                                                                                                                                              भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या गायींचे व त्यांच्या वंशाचे रक्षण ही काळाची गरज झाली आहे. गायीचे धार्मिक महत्त्व हा वेगळा विषय असला तरी गायीचे दूध, तूप, गोमूत्र यांचे आयुर्वेदिक महत्त्व संशोधनातून सिद्ध झाले आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांना कसाई ला न विकता  ते आमच्या गोशाळेत आणून द्यावे. हा विचार समाजापर्यंत पोचावा यासाठी गोवंश रक्षणासाठी अविरत कटिबद्ध आहोत.                                                                                                                                                   अमोल मुथा,                                                                       गो रक्षक, वरोरा

 

error: Content is protected !!