शेतकरी संकटात
नेरी : चिमूर तालुका हा धान पिकासाठी प्रसिध्द आहे. या तालुक्यातील अनेक गावांत धानाचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. यावर्षी सुद्धा शेकडो हेकटरमध्ये धानपिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र पीक ऐन जोमात असताना धानपिकावर रोगाने थैमान घातले असून संपूर्ण पीक उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तेव्हा संबंधित विभागाने या बाबीची दखल घेऊन पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
. निसर्गाच्या लहरीपनाचा फटका याही वर्षी शेतकऱ्यांना बसला असून पिकाची लागवड केली. तेव्हापासून धान पिकावर अनेक संकटे आले होते. यात सुरवातीला अतिवृष्टी पूरपरिस्थिती यामुळे धानपिक वाहून गेले तर शेतकऱ्यांनी इकडून तिकडून रोप जमवून धान पिकांची लागवड केली अनेक वेळा संकटांना तोंड देत फसल मोठी केली आणि पिकाला ऐन जोमात आणले असता पिकावर लाल्या करपा मावा तुडतुडा लाल अळी खोड किडा मानमोड घाटे अळी आदी रोगांनी पिकाला ग्रासले असताना शेतकरी संकटात सापडला आहे पीक काही दिवसात हातात येणार अशी आस लावून असलेल्या शेतकऱ्यांची निराशा निसर्गाने केली आहे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काडुन कीटकनाशके औषधी फवारणी केली मात्र अजुनही रोग आटोक्यात आली नाही तेव्हा कितीदा फवारणी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे यावर्षी पिसोर निसवल्याने अनेक शेतकऱ्यांना निम्मे उत्पादन होणार असल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकटात सापडला आहे तेव्हा संबंधित विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन उपाययोजना करावी तसेच नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.


