खडसंगी येथील घटना
चिमूर : चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खडसंगी येथे गावातीलच दोन तरुणांचा शुल्लक कारणावरून भांडण झाले . भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात दोघांनीही कुऱ्हाडी ने एकमेकावर वार केले. या हाणामारीत एक जण गंभीर असून त्यांचेवर प्रकृती गंभीर असून त्यांचेवर उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार खडसंगी येथील सुरेश सोनुले याने उमेश वांढरे याला मोटाभाऊ असे म्हंटले त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली.त्यांचे रूपांतर हाणामारीत झाले.काहीवेळाने सुरेश ने घरून कुऱ्हाड आणत उमेशवर प्राणघातक हल्ला केला. उमेश ने कुऱ्हाड हिसकावून सुरेश वर हल्ला केला .दोघांनी केलेल्या हाणामारीत दोघेही गंभीर झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले.त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दोघांनाही चिमूर येथील उपचारासाठी दाखल केले.गंभीर जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून एकाला नागपूर ला तर एकाला चंद्रपूर ला रेफर केले असल्याची माहिती आहे.घटनेचा पुढील तपास चिमूर पोलिस करीत आहे.


