Home राजकीय महायुतीच्या समन्वय समितीत चंदनसिंग चंदेल, मंगेश पोटवार, कमलेश शुक्ला यांचा समावेश

महायुतीच्या समन्वय समितीत चंदनसिंग चंदेल, मंगेश पोटवार, कमलेश शुक्ला यांचा समावेश

1340

महायुती निवडणूकीच्या तयारीला

मुल : बल्लारपूर विधानसभा निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे मूल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, शिवसेनेचे कमलेश शुक्ला, या तिघांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
येत्या आठवड्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुकीकरिता आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होण्याचे चिन्ह आहे. महायुतीत भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश असून, प्रचारात सुसुत्रता राहण्याकरिता तीनही पक्षांनी 288 मतदारसंघात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची समन्वयक समिती नेमली आहे.

.       तीनही पक्षाचे समन्वयातून महायुतीचे उमेदवार राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यविकास तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड मताने विजय करण्याचा संकल्प केला असल्याचे समन्वय समितीचे मंगेश पोटवार यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!