माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांची उपस्थिती
भद्रावती : संत शिरोमणी गुरु रविदास महाराज पुण्यतिथी उत्सव मंडळाच्या वतीने गुरुवार दि.१० ऑक्टोबरला संत शिरोमणी गुरू रविदास महाराज मंदिरात वरोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली यांचे उपस्थितीत विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली.
. याप्रसंगी धर्मेंद्र हवेलीकर, मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण मेंढे, सचिव विनोद खंडाळे, कोषाध्यक्ष रवींद्र पवार, सदस्य शंकर सदाफळे, सरीता मेंढे, मंदा शेरकी, रुपाली वाढई, इंदू वाढई आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान संत शिरोमणी गुरू रविदास महाराज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुषमा खंडाळे, सचीव किर्ती पवार,कोषाध्यक्ष कविता मेंढे, यांचे हस्ते अहतेशाम अली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अहतेशाम अली यांनी मंडळाचे कामकाज व पुढील वाटचाली संबंधाने चर्चा केली.त्यांनी यावेळी मंदिराच्या वाढीव बांधकामास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


