तालुका पत्रकार संघाची सदिच्छा भेट
सिंदेवाही : पंचायत समिती कार्यालयातील तत्कालीन गट विकास अधिकारी यांची परभणी येथे बदली झाल्याने येथील गट विकास अधिकारी पद रिक्त होते. त्यामुळे या ठिकाणी नुकतेच मालवण या ठिकाणाहून आलेले आत्मज मोरे यांनी सिंदेवाहीचे गट विकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
. पंचायत समिती सिंदेवाही याठिकाणी मागील अनेक वर्ष अक्षय सुक्रे यांनी गट विकास अधिकारी म्हणून पदभार सांभाळला आहे. मात्र जुलै २०२४ मध्ये त्यांची परभणी जिल्ह्यात बदली झाली असल्याने येथे प्रभारी गट विकास अधिकारी नेमण्यात आले होते. आत्मज मोरे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी असून ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांची प्रशासनात निवड झाली. ऑगस्ट २०२४ पर्यंत परिविक्षा कालावधी म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी सेवा दिली. दरम्यान सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे पदभार स्वीकारला होता. त्यानंतर सिंदेवाही येथे गट विकास अधिकारी म्हणून पहिल्यांदा नियुक्ती झाली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला असून सिंदेवाही तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयातील ढेपाळलेली प्रशासन व्यवस्था नीट करून जनतेच्या समस्या मार्गी लावण्याचे सूचक विधान त्यांनी केले आहे.
. यावेळी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मिथुन मेश्राम, सचिव महेंद्र कोवले, प्रवीण नागदेवते, यांचे कडून आत्मज मोरे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.


