काही हलके तर काही जड प्रतीचे धान
शेतकऱ्यांचे नुकसान
बोगस बियाणे बनविणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी
नेरी : नेरी येथील काशिनाथ चांदेकर, सचिन पिसे, पंकज पाकमोडे आणि इतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात G -9 नामक जड प्रतीच्या 145 दिवसाच्या भात पिकाच्या वाणाची लागवड केली मात्र सदर वाण हे बोगस निघाले असून भेसळ निघाले आहे. शेतातील अर्धे भात पीक हलके निघाले असून कमी दिवसात निसवले आहे तर अर्धे पीक ऐन जोमात आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून धान कापायचे कोणते व ठेवायचे कोणते या विवंचनेत शेतकरी पडलेला असून शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा कृषी विभागाने तात्काळ दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी तसेच बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
. व्यापाऱ्यांकडे 2600 ते 3000 रुपये भाव असताना शेतकरी कृषी केंद्रातून 9000 ते 10000 रुपये क्विंटल नी शेतकरी सिड्स चे बियाणे म्हणून खरेदी करीत असतात त्यामुळे इतके रुपये देत असताना सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक कृषी केंद्राचे मार्फतीने कंपनी करतांना दिसत आहे.
. नेरी येथील साई कृषी केंद्र चालकाकडून G-9 नामक 145 दिवसाचे जड प्रतीचे भात पिकाचे वाण काशीनाथ चांदेकर सहित अनेक शेतकऱ्यांनी खरेदी करून शेतात लागवड केली. मात्र सदर वाण पूर्ण भेसळ निघाले असून अर्धे वाण निसवून ऱ्हास झाले आहे त्यामुळे त्याची कापणी कशी करायची आणि अर्ध्या वाणाचे काय करायचे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे लाखो रुपयांचे येणारे उत्पन्न हातातून जाणार कारण हलक्या प्रतीचे वाण निघाल्याने उत्पादन कमी होणार असून संपूर्ण हलके व जड वान असल्याने ते भेसळ झाले आहे. त्यामुळे या मालाला व्यापारी सुद्धा घेणार नाही तसेच उर्वरित वाण हे निसवण्याचे असल्याने शेतकरी विवंचनेत सापडला असून तो सुद्धा वाण भेसळ असल्याचे दिसत असल्याने शेतकर्यांचे बोगस बियाण्यांनी कंबरडे मोडले असून संकटात टाकले आहे.
. सदर बाबतीत केंद्र चालकाकडे तक्रार केली असता सदर बाबतीत त्यांनी बियाण्याच्या कंपनीला माहीती दिली तेव्हा गीता सिड्स कंपनीने व्यवस्थापकला पाठविले त्यांनी सदर पिकाची पाहणी केली आणि निघून गेले मात्र आठ दिवस होऊनही कुठलीही कारवाई केली नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहेत अनेकदा भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता संपूर्ण दुर्लक्ष होत आहे तेव्हा कृषी विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन बोगस बियानाने पुरवणाऱ्या कंपनीवर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच बोगस कंपनीवर बंदी आणून कारवाई करावी अशी मागणी सदर काशिनाथ चांदेकर सचिन पिसे पंकज पाकमोडे आणि इतर शेतकऱ्यांनी केली आहे.


