बल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई
चार जणांचा गुन्हेगारी कटात सहभाग
बल्लारपूर : शहरात अनेक दिवसापासून मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. यामुळे वाहन चालकांत धास्ती निर्माण झाली होती. असीच एक घटना बल्लारपूर शहरातील कादरिया मस्जिद चौकात राहणारे अजय रामसागर बेन्नी यांची मोटारसायकल अज्ञात आरोपीने २२ सप्टेंबर रोजी पळवल्याची तक्रार बल्लारपूर पोलीस ठाण्यात केली. या घटनेचा तपास करताना पोलिसांना चार जणांचा सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले. बल्लारपूर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात आरोपींना गजाआड केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.
. या घटनेतील आरोपीचे नाव प्रींन्स उर्फ कालू संग्राम बहुरिया रा.सरदार पटेल वार्ड, बल्लारपूर,पुतीलाल उर्फ हनी बाबुलाल निशाद रा. रामनगर सास्ती, ता. राजुरा, तौकीर तौहीद शेख रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर, भंगार विक्रीच्या व्यवसायात असलेले जावेद रा. गणपती वार्ड, बल्लारपूर असे असून या आरोपी विरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 303 ( 2 ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
. या घटनेत मुख्य आरोपी प्रिंस उर्फ कालू बहुरिया (२0) हा आहे. सदर युवक चोरीच्या मोटारसायकल इतरांना विकत होता. बल्लारपूर पोलीस मोटारसायकल चोरीच्या घटनेतील आरोपीवर पाळत ठेवून होते. गस्ती दरम्यान प्रिंस उर्फ कालू बहुरिया हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पद अवस्थेत फिरत होता.पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. मात्र,तो उडवाउडवीचे उत्तर देत होता.पोलिसांनी आपला खाक्या दाखविताच तो पोपटा सारखा बोलू लागला.प्रिंस उर्फ कालू बहुरिया याने मित्र सुरेश उर्फ सुर्या कैलास हरणे (२0) रा.श्रीराम वार्ड, बल्लारपूर सोबत बामणी (दुधोली ) व डॉ. आंबेडकर वार्ड, बल्लारपूर येथून मोटारसायकल चोरी करून विकल्याची कबुली दिली.
. चोरीच्या मोटारसायकलची मोडतोड करून त्याचे सुटे भाग भंगार व्यवसाय करणारे विकत होते. या कटात गॅरेज चालकाचा देखील सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.बल्लारपूर पोलिसांनी ही मोठी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील गाडे,सहायक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले, उपनिरीक्षक गोविंद चाटे,हुसेन शाह,गजानन डोईफोडे, रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, सुनील कामटकर, पुरूषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, अनिता नायडू यांच्या पथकाने केली.
आरोपींकडून पाच मोटारसायकल केल्या जप्त बल्लारपूर पोलिसांनी मुख्य आरोपी प्रिंस उर्फ कालू बहुरिया याचे कडून चोरी केलेल्या काळ्या रंगाची हिरो फॅशन प्लस ( एम.एच.34/ झेड 1140 ) व काळ्या रंगाची बजाज प्लसर ( एम.एच.34/ ए.एस. 5237 ) तर पुतीलाल उर्फ हनी निशाद याचे कडून काळ्या रंगाची हिरो स्पलेंडर ( एम.एच.34/ बी.जे.5937 ), हिरो स्पलेंडर ( एम.एच.34/ झेड 3128 ) आणि हिरो स्पलेंडर ( एम.एच. 34/ ए.जे. 5751 ) या क्रमांकाच्या पाच मोटारसायकल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.तौकीर तौहीद शेख याचे कडून तीन मोटारसायकल चे इंजिन ताब्यात घेतले आहे.जावेद कडून चार मोटारसायकलची इंजिन व सुटे भाग जप्त केली आहे. या टोळी कडून पुन्हा गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस कसून तपास करीत आहे.


