नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळच असलेल्या गोंदेडा येथे दि. 05 ऑक्टोबर ल वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. ब्रह्मपुरी वन विभाग, तलोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत नेरी वनविभागाच्या वतीने गोंदोडा येथे वन्यजीव सप्ताह निमित्त निसर्ग भ्रमण व श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते.
. या शिबिराचे उद्घाटन सहाय्यक वनसंरक्षक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गायकवाड प्रमुख मार्गदर्शक म्हणून तरुण पर्यावरणवादी मंडळाचे आमोद गौरकर, विजय गजबे, स्वॅग संस्थेचे यशवंत कायरकर जिवेश सोयाम आदी उपस्थित होते.
. यावेळी श्रमदानातून पाझर तलावाला गोट्याची पीचींग करण्यात आली तसेच निसर्ग भ्रमण करण्यात आले या निसर्ग भ्रमण मध्ये जंगलाचे संरक्षण या विषयावर सहाय्यक वनसंरक्षक गायकवाड यांनी मार्गदर्शन केले तर पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज या विषयावर यशवंत कायरकर यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्प ज्ञान, अंधश्रद्धा या विषयावर अमोद गौरकर, वन्यजीवांची अन्नसाखळी या विषयावर विजय गजबे यांनी मार्गदर्शन केले.
. यावेळी शाळेचे विद्यार्थ्यां, वनविभागाचे कर्मचारी, तथा पर्यावरणवादी मित्र मंडळाचे सभासद यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्र सहाय्यक रासेकर यांनी केले होते.


