भटाळा तलावात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
मामा तलावाच्या दुरुस्तीची मागणी
वरोरा : तालुक्यातील भटाळा येथे पुरातन काळापासून 99 एकर जागेवर मामा तलाव आहे. मात्र अजूनपर्यंत या तलावाचे आणि मुख्य नहराचे कुठल्याही प्रकारचे दुरुस्तीचे काम झाले नाही त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना श्रम दान करून दरवर्षी तलाव आणि कालव्याचे काम करावे लागत आहे. वारंवार प्रशासनाला निवेदन दिले असतानाही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने सोमवारी दि 30 रोजी शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी चक्क 15 फूट खोल पाण्यात उड्या घेत जलसमाधी घेत अनोखे आंदोलन केले.
. वरोरा तालुक्यातील भटाळा गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथील पुरातत्व हेमाळपंथी मंदीर शिव मंदिरामुळे भटाळा गाव जगप्रसिद्ध झाले. याचं गावात भोसले काळापासून 99 एकरात मामा तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावामुळे परिसरातील 300 हेक्टर शेतजमीनीं सिंचनाखाली आल्या. अनेक वर्ष होऊनही या तलावाची प्रशासनाकडून डागडुजी केल्या गेली नाही त्यामुळे या मामा तलावाचे अस्तित्व धोक्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी या तलावाच्या दुरुस्ती साठी प्रशासनाला निवेदने दिली मात्र याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर शेतकऱ्यांनी स्वतःच श्रमदानातून मामा तलावाचे बांधकाम डागडुजी केली. मात्र शेतकरी यांनी मागील दहा ते पंधरा वर्षा पासून निवेदन देत आहे तरी पण प्रशासन कडून कुठलेही कारवाई केली नाही म्हणून वरोरा येथील शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जल समाधी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
. तर शेतकऱ्यांच्या खात्यात कुठलीही पिक विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली नाही त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांनी आमची फसवणूक केली म्हणून जलसमाधी आंदोलन स्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन दिले या आंदोलनस्थळी शेगाव पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव, शाखा अभियंता मुत्तलवार, व शेतकरी अनिल चौधरी, प्रकाश तुमसरे, विठ्ठल दानव, संदिप वासेकर, विशाल मोरे, सुधाकर डुकरे, प्रसाद मिलमिले, अनाजी देवगडे, शंकर जांबुडे, राजू जांभुळे, विठ्ठल मौजे व शेकडो शेतकरी उपस्थित होते.


