Home सामाजिक डोमा आदि. वि. का. ची आमसभा सभा संपन्न

डोमा आदि. वि. का. ची आमसभा सभा संपन्न

1325

शेकडो नागरिकांनी लावली उपस्थिती

नेरी : चिमूर तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळ मुक्ताई ला लागून असलेल्या डोमा येथील आदि. वि. का. संस्था ची वार्षिक साधारण सभा दि 29 सप्टेंबर ला पार पडली.

.       या सभेला संस्थेच्या कवडशी, शिवरा, किटाडी, खापरी, डोंगरगाव, चक जाटेपार, हिरापुर या गावातील शेकडो सभासदांनी उपस्थिती दर्शवली. ही सभा संस्थेचे अध्यक्ष दशरथ नन्नावरे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सभेचे संस्थेचे उपाध्यक्ष मनोज गावंडे, संचालक नामदेव चौधरी, हरिभाऊ सातपुते, प्रफुल मालके, रमेश बावनकर, शंकर भरडे, आनंदराव गरमळे, सखाराम सावसाकडे, तुळशीराम नन्नावरे, सायत्राबाई चौधरी तसेच  शेकडो नागरिक उपस्थित होते. सभेच्या शेवटी सर्व नागरिकांना भोजन देऊन वार्षिक साधारण सभेची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!