मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या ग्रामगीता व भगवी टोपी देवून सत्कार

18
ग्रामगीता देऊन सत्कार करताना अंकुश आगलावे

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हयात मोरवा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत प्रामुख्याने उपस्थित असलेले मान्यवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस यांचे ग्रामगीता व भगवी टोपी देवून डॉ. अंकुश आगलावे, जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा ग्रामीण यांनी सत्कार केला. .

चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रचारार्थ मोरवा येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्त मान्यवरांचे ग्रामगीता देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ.अंकुश आगलावे यांनी सांगितले की सुधीरभाऊ यांनी मोझरी येथील आश्रमास अ वर्गाचा दर्जा दिला तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्यावर चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. मागील अनेक दशकांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळण्याची मागणी आहे. त्यासाठी सुधीरभाऊ प्रयत्नशिल असल्याचे यावेळी सांगितले