चंद्रपूर जिल्हयात भाजपा ओबीसी मोर्चाची कार्यकारणी गठीत

27

 

:- भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. आगलावे यांची निवड झाल्यापासून पक्षांनी दिलेल्या जवाबदारी पूर्ण करीत जिल्हयातील पंधरा तालुक्यामधील बावीस मंडळामध्ये संपूर्ण कार्यकारिणी गठीत करून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ओबीसी मोर्चाची बांधणी मजबुत केल्याचे डॉ. अंकुश आगलावे यांनी एका पत्रकाव्दारे सांगितली आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजयजी गाते व भाजपा जिल्हाध्यक्ष हरिशजी शर्मा यांचे सुचनेनुसार व मार्गदर्शानात संपूर्ण जिल्हयात डॉ. आगलावे यांनी भाजपा ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी गठीत करून चंद्रपूर जिल्हयातील व तालुकातील कार्यकारणी मजबुत केली आहे.

प्रत्येक तालुक्यात अनेकांची पक्षात प्रवेश करून पक्षाला बळकट करण्याचे काम केले. यावेळी विजयाकडे वाटचाल करीत सुधीरभाऊ मुनगंटीवार हे बहुमताने निवडुण येवून चंद्रपूर जिल्हयाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला .