अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

1665
  • चंद्रपूर नागपूर महामार्गावरील घटना 

वरोराफायनान्स कंपनीची दिवसभर वसुली करून पल्सर दुचाकीने घरी परत येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. १२ ला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर नागपूर महामार्गावरील मोठा मजरा गावाजवळ घडली. अपघात इतका भीषण होता की पल्सर दुचाकीचे दोन तुकडे झाले. गौरव शिवणकर (२९) रा नंदोरी असे मृतकाचे नाव आहे.

.          प्राप्त माहिती नुसार भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील गौरव शिवणकर हा नुकताच स्पंदन फायनान्स कंपनीत महिला गटांना देण्यात येणाऱ्या स्मॉल लोन च्या वसुलीचे काम करीत होता. गौरव हा नेहमीप्रमाणे वरोरा तालुक्यातील टेमुर्डा परिसरात वसुली साठी गेला होता. दिवसभर आपले काम आटोपून गौरव हा. नंदोरी येथे स्वगावी येत असताना रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वरोरा तालुक्यातील मोठा मजरा गावाजवळ एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. धडक इतकी गंभीर होती की पल्सर दुचाकीचे दोन तुकडे झाले तर गौरव च्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गौरवचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माहित होताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. वरोरा पोलिसांना माहिती मिळताच घटना स्थळी पोहचून गौरव चे प्रेत उत्तरणीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले

.