अशोक सांगुळले यांचे निधन

27

सिंदेवाही :  येथील गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त तलाठी अशोक सांगुळले यांचे आज सायंकाळी पाच वाजता दुःखद निधन झाले. ते शांत, संयमी व्यक्ती असून सिंदेवाही विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

.       सिंदेवाही येथे महसूल विभागात नोकरी करीत असताना त्यांनी अनेक व्यक्तींना आपल्या जवळ केले होते. त्यामुळे ते अनेकांच्या मनातील विश्वासू व्यक्ती म्हणून परिचित होते. महसूल विभागातून सेवानिवृत्त झाल्या नंतर ते तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रभावित होऊन गुरुदेव सेवा मंडळाचे काम करीत होते. त्यांचे दुःखद निधनाने सांगुळले परिवार यांचेवर अतिशय दुःख कोसळले आहे.