Home निधन वार्ता वरोरा येथील विवेकानंद ज्ञानपीठचे माजी अध्यक्ष हाजी ईजाज अशरफ यांचे निधन

वरोरा येथील विवेकानंद ज्ञानपीठचे माजी अध्यक्ष हाजी ईजाज अशरफ यांचे निधन

162

शिक्षण क्षेत्रातील एक संवेदनशील नेतृत्व हरपले

भद्रावती येथे शोकसभा

भद्रावती : चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था ‘विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा’चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक  हाजी ईजाज अशरफ यांचे काल सकाळी ११ वाजता नागपूर येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वरोरा आणि भद्रावती परिसरात शोककळा पसरली आहे.

.      हाजी ईजाज अशरफ यांच्या निधनानिमित्त भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुधीर आस्टुनकर यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. सभेला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मूक श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर आदर व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयास सुटी देण्यात आली.

.       विवेकानंद ज्ञानपीठचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, “अशरफ साहेबांच्या निधनाने संस्थेचे आणि शाळा-महाविद्यालयाचे अपरिमित नुकसान झाले आहे. आपण एक संवेदनशील आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व गमावले असून त्यांच्या कार्याची आठवण सदैव प्रेरणा देत राहील.”

error: Content is protected !!