Home सामाजिक किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समस्या व उपाय यावर मार्गदर्शन

किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समस्या व उपाय यावर मार्गदर्शन

1226

कोठारी : येनबोली येथील कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात  किशोरवयीन मुलींन साठी आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

.       या कार्यक्रमाला महाविद्यालय तसेच शाळकारी मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी महिला अत्याचार प्रतिबंधा कायद्याचे मार्गदर्शन करताना  अॅड. मंगला बोरीकर म्हणाल्या की मुलींनी शारीरिक स्वच्छते बाबत दक्ष राहावे नेहमी पालेभाज्या, मोड, आलेले कडधान्य,गूळ शेंगदाणे आदी सरस आहार घ्यावा तसेच मुलींनी गुड टच – ब्याड टच आणि पीसी पीएनडीटी (गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्ण गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा 1994) याविषयावर माहिती सांगितले.

.       या कार्यक्रमाला मुख्याध्यापक बी.एम बोधले, राजेश वाळके, लोहे उपस्थित होते आणि मार्गदर्शन केले व कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेतले.

error: Content is protected !!