पुन्हा अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
ब्रम्हपुरी : नुकत्याच महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षाचे प्रसिद्ध प्रमुख विनोद दोनाडकर यांनी राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना झटका दिला होता. एक वेगळे व्यक्तिमत्व आणि राजकीय जेष्ठ कार्यकर्ते म्हणून २२ वर्षापासून पक्षात त्यांची आगळी वेगळी ओळख होती. मात्र महिनाभऱ्यापूर्वी विनोद दोनाडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून इंदिरा काँग्रेसमध्ये पक्षात प्रवेश प्रवेश केला होता. परंतु काँग्रेस पक्षात फारसा त्यांना प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे त्यांनी परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबतचे इतर मतभेद विसरून घरवापसी केल्याचे संकेत सूत्रांकडून प्राप्त झाले आहेत.
. ब्रह्मपुरी तालुका इंदिरा काँग्रेस पक्षाचे कार्यालय प्रमुख सुधीर पंदीलवार यांना थेट माहिती देऊन इंदिरा काँग्रेस पक्षातील असंघटित कामगार सेलच्या तालुकाध्यक्षपद व कार्यकर्ता पदाचा राजीनामा विनोद दोनाडकर यांनी दिला असून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखीच बळकट होणार आहे. एवढेच नव्हे तर भविष्यात त्यांना मोठे पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मिळणार असल्याची चर्चा ब्रह्मपुरीच्या राजकीय वर्तुळात आहे.


