काजळसर येथे दोन दिवसीय रमाई जयंती कार्यक्रमाचे आयोजन
नेरी : स्वतःसाठी न जगता बाबासाहेबांना मोठे करण्यासाठी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजाच्या सेवेसाठी जीवन अर्पण करणाऱ्या महान विभूती मातोश्री रमाई त्यांचा सारखा बलिदान कुणीही करू शकत नाही म्हणून रमाई आंबेडकर ह्या त्याग आणि बलिदानाची मूर्ती असून सर्व समाजाची आई आहे. त्यांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे विचार समाजातील प्रत्येक महिलांनी अंगिकरावे व जीवन समृद्ध करून घ्यावे असे प्रतिपादन सरपंच दिक्षा पाटील यांनी काजळसर येथील दोन दिवसीय रमाई जयंतीनिमित्त आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलतांना केले.
. नेरी जवळील काजळसर येथे दि 6 व 7 फरवरीला मातोश्री रमाई महिला मंडळ आणि यशोधरा महिला मंडळ आणि बौद्ध समाज मंडळाच्या वतीने दोन दिवसीय मातोश्री रमाई जयंती कार्यक्रमाचे आयोजन दीक्षाभूमी प्रांगणावर करण्यात आले होते. सकाळी रांगोळी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेऊन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आले यानंतर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला गौतम बुद्ध डाँ बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लोहारा च्या सरपंच दिक्षा शैलेंद्र पाटील उपस्थित होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रज्ञा राजूरवाडे, नामदेव भिकाजी खोब्रागडे तर प्रमुख पाहुणे म्हणून मीनाक्षी गुणवंत गायकवाड, पो पाटील खुंटाळा वर्षा माधव बन्सोड,शिक्षिका मृणाली बोरकर, सरपंच खुंटाळा माधव बन्सोड,शैलेंद्र पाटील, रामदास पाटील, हिरालाल मेश्राम, जि टी खोब्रागडे, देवा कावळे आदी मान्यवर म्हणून उपस्थित होते.
. या कार्यक्रमात मान्यवरांनी मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी केलेल्या त्यागाची आणि बलिदानाची माहिती समाज बांधवांना दिली यानंतर रात्रोला प्रकाश मेश्राम यांच्या वादळ निळ्या क्रांतीचे बुद्ध भीम गीतांचा वादळी झंझावात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


