४ जणावर वन गुन्हा दाखल
वरोरा वनविभागाची कारवाई
वरोरा : वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येत असलेल्या मौजा सुर्ला कक्ष क्र. 14 ब मधील बामनडोह नाल्यातून अवैद्यरित्या रेती उपसा करणारे दोन ट्रॅक्टर पकडून ४ जणावर वनगुन्हा अंतर्गत कारवाई करण्यात आली. वनविभागाच्या धडक कारवाईने वनपरिक्षेत्रात अवैध रेती तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
. प्राप्त माहितीनुसार वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येत असलेल्या मौजा सुर्ला कक्ष क्र. 14 ब मध्ये बुधवारी दि. 07 ला सकाळी 5.30 वाजताचे दरम्यान वनकर्मचारी अमोल डी. तिखट वनरक्षक वरोरा, व रोजनदारी वनमजुर गस्त करीत असतांना बामनडोह नाला मधुन २ ट्रॅक्टर अवैधरित्या रेतीची उत्खनन करतांना आढळून आले. यात दोन्ही ट्रॅक्टर क्रमांक MH 34 CD 7841 व ट्रॅक्टर क्र. MH34 TC 165 रेती सहित ट्रॅक्टर ट्रॉली व इतर साहित्य ताब्यात घेऊन आरोपी भास्कर देवाजी राणे, विकास पांडुरंग काळमेंगे, सुमित बबन काळमेंगे सर्व रा. बांद्रा व रुतिक महादेव गोंडे रा. वनली यांच्या विरुद्ध अन्वये वनगुन्हा नोंद करुन वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा येथे आणण्यात आले.
. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश के. शेंडे, वरोरा यांचे मार्गदर्शनात एस. डी. खोब्रागडे क्षे.स. वरोरा, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, व्हि. एम. ढुमणे वनपाल, गजानन एम. बोढे वनरक्षक शेगाव, व अमोल डी. तिखट वनरक्षक वरोरा करीत आहे.


