मुल : माता रमाबाई आंबेडकर जयंती दिनाचे औचित्य साधून महिला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ उपजिल्हा रुग्णालय मुल येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मूल शहराध्यक्ष धारा मेश्राम(बुरांडे) यांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानत स्वतः पुढाकार घेत त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्यसाधत उपजिल्हारुग्णालय मुलं येथे रुग्णांना फळ वाटप करून सामाजिक बाधिलकी जपली. योगायोग त्यांचाही वाढदिवस होता.
. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे मूल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार, शहराध्यक्ष आकाश येसनकर, युवक तालुकाध्यक्ष रोहित कामडे, महिला तालुकाध्यक्ष संगीता गेडाम, माला शेंडे, रंजना सुखदेवे, रोहित शेंडे, प्रणय रायपुरे, हिरेन दहिलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


