गुरुवारी  वासेरा येथे *लाखात एक लाडाची लेक” नाटकाचे आयोजन

22
  • नवनिर्मित रंगतरंग नाट्य मंडळाचे २५ वर्ष पूर्ण.

सिंदेवाही

.           विदर्भाची सांस्कृतिक कलाभुमी म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी. विदर्भात शहरी करणाचे वारे वाहू लागले असले, तरी झाडीच्या मातीने आपली नाट्य परंपरा जोपासली आहे. वासेरा येथील नवनिर्मित रंगतरंग नाट्य कलाकृती या मंडळाचे २५ वर्ष पूर्ण होत असून आज झाडीपट्टी मराठी रंगभूमी वडसा निर्मित शेखर पटले दिग्दर्शित लाखात एक लाडाची लेक या नाटकाचे आयोजन मेश्राम बंधू यांचे आवारात करण्यात आले आहे.
.           या नाटकात सिनेस्टार विशाल तराळ, शेखर पटले प्रमुख भूमिकेत असून , प्रेमकुमार मलोडे, आशिष उईके, कालिदास भोयर, पप्पू भर्रे, लुकेश फुलबांधे, तसेच प्रज्ञा पवार, शिल्पा पाटील, टिना, आणि हंसिनी पुणेकर या कलावंताच्या संचात सादर करण्यात येत आहे. या नाटकाचे उदघाटन आरोग्य सेविका सोनाली अरविंद सूर्यवंशी यांचे हस्ते होणार असून सहउदघाटक म्हणून विक्रीकर अधिकारी प्रणय देवगडे, सामजिक कार्यकर्ते नीक्कु भैसारे राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिला जीवन कोवले, जालिंदर कोवले, उपाध्यक्ष सरपंच महेश बोरकर, काँग्रेस महासचिव हरिभाऊ बारेकर, दीपप्रज्वलन प्रतिभा हेमंत सूर्यवंशी, रजनी भास्कर कोवले, रंगमंच पूजन डॉ. राजपाल खोब्रागडे, निखिल नागसेन मेश्राम इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नवनिर्मित नाट्य मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून या नाटकाचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन मंडळाचे मुख्य संयोजक महेंद्र कोवले, यांनी केले आहे.