उमेदवाराच्या प्रचाराची पोस्ट टाकणे ” त्या ” सरकारी बाबूला पडणार महागात

320
  • शासकीय कर्मचाऱ्याकडून आदर्श आचारसंहितेचा भंग 

चंद्रपूर

.        निवडणुकीच्या काळात सरकारी कर्मचारी यांच्याकडून कोणत्याही उमेदवाराचा प्रचार होणार नाही, तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग कोणाकडूनही होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीतील एका उमेदवाराच्या प्रचार सभेची पोस्ट व्हाट्सअप ग्रुपवर टाकल्याने ‘ त्या ” सरकारी बाबू ला ही पोस्ट टाकणे महागात पडणार असल्याची खमंग चर्चा होत आहे.

..               शासकीय कर्मचारी निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा घटक आहे . त्यामुळे त्याच्यावर जबाबदारीची कामे दिली जातात. निवडणुकीचे कामही याच सरकारी कर्मचाऱ्याकडे दिले जाते. यात जवळपास सर्वच विभागांतील अधिकारी,कर्मचाऱ्यांचा समावेश असतो.

.           प्रत्येकावर कोणत्या ना कोणत्या पक्षाचा, नेत्याचा प्रभाव असतो. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष स्वरुपात प्रत्येक जण त्या त्या पक्षाचा वा उमेदवाराचा प्रचार करतात. असा प्रचार करण्याची सर्वांनाच परवानगी आहे, परंतु यात एक अपवाद आहे, तो म्हणजे सरकारी कर्मचारी, सरकारी कर्मचाऱ्याने कुणाचाही प्रचार करू नये, असा नियम आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्याने निष्पक्ष राहून काम करावे, अशी यामागे अपेक्षा आहे. मात्र निवडणूक काळात सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना एखाद्या उमेदवाराचा प्रचार करणे महागात पडणार आहे. त्यांना निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षांचा प्रचार करता येत नाही, तरीही काही कर्मचारी उघडपणे अथवा गुपचूप सोशल मीडियावर एखाद्या उमेदवाराच्या प्रचाराच्या पोस्ट व्हायरल करतात. निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असूनही सरकारी कर्मचार्यांकडून असे प्रकार घडतात. यंदा निवडणूक आयोगाचे सोशल मीडियावर बारकाईने लक्ष असून सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून प्रचाराचे प्रकार घडल्यास थेट निलंबनाची कारवाई होणार असल्याचे परिपत्रकच जाहीर केले. तसे चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा हे स्वतः याकडे जातीने लक्ष देतांना दिसून येत आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका शासकीय कर्मचाऱ्याच्या उत्साह संचारला आणि त्याने कुठलाही विचार न करता एका व्हाट्सअप ग्रुप वर लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचार सभेची पोस्ट वायरल केली. त्यांच्या या व्हायरल पोस्टमुळे आदर्श आचारसंहितेचा कर्मचाऱ्यांकुनच भंग होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या वायरल पोस्टची वरोरा तालुक्यात चांगली चर्चा होत आहे. तर या सरकारीबाबूं नी व्हाट्सअप वर टाकलेली पोस्ट त्यांच्या अंगलट येणाची दाट शक्यता आहे.