शेळ्यावर ताव मारणाऱ्या बिबट्याला गावकऱ्यांनी पळवून लावले

22
  • बिबट्याची बोथली गावात दहशत,

नेरी,

.               नेरीवरून जवळ असलेल्या बोथली येथील गुरांच्या गोट्यावर मागील काही दिवसांपासून बिबट्याने आक्रमण करून अनेक गुरांना ठार केले . नुकतेच दि 8 एप्रिलला दोन बोकड व ऐका शेळीला ठार केले. तसेच दि11 तारखेला गोट्यातील ऐका गोऱ्याला जखमी केले त्यामुळे रोजच बिबट्याचे वावर या गावात वाढले असून अनेकांना बिबट्या दर्शन देत आहे. त्यामुळे बिबट्याची दहशत गावात निर्माण झाली आहे सदर घटनेची तात्काळ वनविभागाने दखल घेऊन बिबट्याला प्रतिबंध घालण्यासाठी दि 12 ला फटाके फोडून बिबट्या ला आवर घालण्याचे काम केले असून गस्त सुरू केली आहे.

.               बोथली हे गाव जंगल भागाला लागून असून अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन अनेकदा गावात येत असतो आणि गावाच्या दोन्ही टोकावरील गुरांच्या गोट्यावर आक्रमक करून गुरांना ठार करीत असतो. बोथली येथील अनेक गुरांवर आतापर्यंत ताव मारला आहे. दि 11 ला देवराव बारेकर यांच्या मालकीच्या गोऱ्यावर हल्ला करून जखमी केले सदर वेळी तात्काळ गुरांचा मालक जागा झाल्याने गोऱ्याचे प्राण वाचले आणि बिबट्याने धूम ठोकली मात्र रोजच बिबट्याचे गावशेजारी दर्शन होत असल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे. सदर बाबीची दखल घेत वनविभागाने बिबट्याला हाकलण्यासाठी फटाके फोडले असून रोजच ग्रस्त देत आहेत यामध्ये वनरक्षक पाटील काजळसर बिट ,वनरक्षक वडजे बोलधा बिट आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले असून बिबट्या चे बंदोबस्त करण्याचे तसेच मृत जनावरांचा मोबदला मिळावा अशी मागणी केली आहे