Home विदर्भ कुठे सर्जा राजाला गमावले, तर कुठे घराचे छत उडाले 

कुठे सर्जा राजाला गमावले, तर कुठे घराचे छत उडाले 

1451
  • पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका
  •  मायबाप सरकार मदत करेल का?

संदीप झाडे

कुचना

..                 सोमवारी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने – चांगलीच दाणादाण झाली खरंतर या अवकाळी पावसाचा फटका नेहमी बळीराजालाच बसत असतो. ऐन हंगामाच्या वेळी कुठे आपल्या सर्जा राजाला गमवावे लागले, तर कुठे घराचे छत उडाले आणि पिकांचे नाहक नुकसान झाले . निसर्गाच्या या लहरीपणामुळे आज बळीराजा तूर्तास हतबल झाला आहे. मोडकळीस आलेल्या या बळीराजाचा आवाज या मायबाप सरकार ऐकू जातील का? त्यांचे अश्रू यांना कळेल काय ? अशी आर्त हाक आता कानावर येऊ लागली आहे.

.    .           २२ एप्रिल रोज सोमवारला झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण झाली. अचानक वातावरणात बदल झाला आणि संध्याकाळी ५.३० ला विजा कडाडून ,जोरदार वारा आणि गारपीटीसह जोरदार पावसाला सुरवात झाली अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.या अवकाळी पावसाने उन्हाळी मूग ,सोयाबीन ,भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

सुसाट वाऱ्याने मोठ मोठी झाड खाली उलमडून पडली,तर पळसगाव येथील अमोल जोगी यांच्या घरावरील टिना पूर्णपणे उडून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे,जीवनावश्यक वस्तूंचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तरी प्रशासनाने लवकरात लवकर मुग,सोयाबीन,भाजीपाला पिकांची पाहणी करून मदत करण्याची मागणी करीत आहे.वारंवार होणाऱ्या या अवकाळी पावसाने शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला असून शेतकरी नैराश्यात आलेला आहे मात्र सरकार प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची स्थानिक शेतकऱ्यांची खंत आहे.

.            माजरी परिसरात रात्रीच्या पावसात विजेचे खांब तुटून पडल्याने रात्री लाईटची बत्तिगुल झाली.वाऱ्याचा जोर एवढा होता की मोटारगाडी चालविणे कठीण झाले होते.प

पिकांचे झालेले नुकसान

ळसगाव येथील अमोल जोगी यांच्या घरावरील छत टिना पूर्णपणे उडून गेल्याने घरातील सर्वच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे,जीवनावश्यक वस्तूंचे फार मोठ्या नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!