गोंडपिपरीत उरकल्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा

35

 २३ महाविद्यालयांचा सहभाग 

कोठारी 

.         गोंडवाना विद्यापिठा अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा गोंडपिपरीत नुकत्याच पार पडल्या. यावेळी २३ महाविद्यालयांनी यात सहभाग नोंदवला.

.         स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स गोंडपिंपरी येथे विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ७ व ८ डिसेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या झोन “अ” मधील २३ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. एस. पी. कॉलेज चंद्रपूरच्या महिला कबड्डी चम्मूने प्रथम स्थान, महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्सच्या चम्मूने द्वितीय स्थान तर चिंतामणी कॉलेज गोंडपिंपरीच्या चम्मूने तृतीय स्थान पटकावले. स्पर्धेचे उदघाटन गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाणेदारांनी खेळाडूंना दैनंदिन जीवनात खेळाचे महत्व पटवून दिले.

.         खेळाचे महत्व अनन्य साधारण असून यामूळे मानसिक, शारिरीक, बौद्धिक विकास होतो असे प्रतिपादन केले. मुख्य अतिथी म्हणून चिंतामणी महाविद्यालय, पोंभुर्णा येथील डॉ. गिरीपूंजे यांनी उपस्थित महिला खेळाडूंना खेळाडू वृत्ती कशी जोपसावी, या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणात प्राचार्य डॉ. मोहन गिरिया यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आवडत्या खेळात भाग घेऊन राष्ट्रीय स्तरावर स्वतःचे व देशाचे नाव केले पाहिजे असे विचार मांडले. प्रास्ताविक डॉ.रुद्रप्रताप तिवारी, सूत्रसंचालन डॉ.शरद लखेकर तर आभार प्रा.अविनाश चकिनारपूवार यांनी मानले. स्पर्धेत विविध कॉलेजचे प्राध्यापक, महिला कबड्डी खेळाडू तसेच चिंतामणी कॉलेज गोंडपिंपरीचे उपप्राचार्य डॉ. आशिष चव्हाण, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.