नवरगावातील  बाळू लोखंडे च्या दंडारी प्रयोगाला प्रेक्षकांची पसंती

21

 15 वर्षात केले 700 च्या वर प्रयोग 

चंद्रपुर : नवरगावातील बाळू लोखंडे हे गेल्या 15 वर्षापासून दंडारीचा प्रयोग करीत आहे. त्यांनी आजपर्यंत 700 च्या अधिक दंडारीचे प्रयोग सादर केले.  त्यांच्या दंडारी प्रयोगाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली आहे.

.        बाळू लोखंडे हे स्वतः, लेखक / दिग्दर्शक असून स्वतः लेडीच भूमिका करतात. त्यांनी मित्रांगण दंडार मंडळ स्थापन करून अनेक दंडारीचे प्रयोग गावागावत सादर करीत आहेत, यात सुंगंधा वणवास, सासुरवास, जमीन विकली गावखारी, नखरेल नार, सासूबाई सांभाळ स्वतःला, इहीणबाई सांभाळ तुझी, गृहलक्ष्मी, तारांगना वणवास, बिजली कडाडली, अशा अनेक दंडारीमध्ये त्यांनी स्त्री भूमिका केली असून, आज झाडीपट्टीत बाळू लोखंडे च्या नावाची चर्चा आहे, जसं नाटकामध्ये नटीला बोलावतात अगदी तसंच बाळू लोखंडेला बाहेर गावातील दंडार मंडळ त्यांना स्त्री भूमिका करायला आवडीने बोलावतात, त्या मंडळाच्या आग्रहास्तव बाळू लोखंडे हे 200 किलोमीटर तर कधी 150 किलोमीटर प्रवास करून जातात, बाहेर गावला त्यांची मागणी आहे, या गणेश उत्सवापासून आतापर्यंत 42 दंडारीचे प्रयोग सादर केले आहे,

.        त्यांचा दंडारी मागचा मूळ उद्देश 150 वर्षाची लोककला ही समोर जपून ठेवणे, दंडारीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम ते गेल्या 15 वर्ष्यापासून करीत आहेत, यात त्यांना शासनातर्फे कोणताही मोबदला मिळत नसून स्वतःसह रसिकमायबापांच्या देणगीतून सर्व खर्च ते करीत आहेत, आणि त्याच देणगीतून बाळू लोखंडे हे, हा पैसा समाजाचा आहे, आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना मनात ठेऊन, अपंगाला तीन चाकी सायकल तर कधी वृद्ध महिलांना साडी भेट देणे असा उपक्रम ते राबवत असतात, आज झाटीपट्टीत बाळूची दंडार म्हणुन गावागावत प्रसिद्ध आहे.