कवी नीरज आत्राम बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मानित 

15

वरोरा
.          बंधुता लोकचळवळीचे सुवर्णमहोत्सवी आणि राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद,बंधुता प्रतिष्ठान,काषाय प्रकाशन पुणे,रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध, भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रतिम प्रकाश महाविद्यालय भोसरी आणि भारतीय जैन संघटनेचे कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय वाघोली पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमान, नुकत्याच झालेल्या “२५ वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन” एस.एम.जोशी सभागृह गांजवे चौक,नवी पेठ पुणे येथे “बंधुता काव्य प्रतिभा पुरस्कार” कवी नीरज महादेव आत्राम यांना संमेलनाध्यक्षा, मधुश्री ओव्हाळ, पूर्वाध्यक्ष प्रा. शंकर आथरे, उद्घाटक डॉ. मनोहर जाधव, स्वागताध्यक्ष,प्रा. चंद्रकांत वानखेडे, स्वागताध्यक्ष डॉ. बंडोपंत कांबळे, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, ( संस्थापक अध्यक्ष), प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, ( मुख्य निमंत्रक ) सूत्र संवादक संगीता झिंझुरके, या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

.        या आधी सुद्धा जिल्हा स्तरीय , विदर्भ स्तरीय,राज्यस्तरीय, आणि राष्ट्रीय अशा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत केले आहे. कवी नीरज आत्राम यांना” बंधुता काव्य प्रतिभा पुरस्कार “हा त्यांनी दिलेल्या, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नातेवाईक,मित्रमंडळी,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार, साहित्यिक,सारस्वत यांचेकडून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.