कबड्डी स्पर्धा हे ग्रामीण क्षेत्रातील युवकांसाठी वरदान : घनश्याम डुकरे

40

नेरी

.          कबड्डी हा महाराष्ट्र राज्यातील पारंपरिक मैदानी खेळ आहे. मात्र दिवसेंदिवस या खेळाबद्दल आवड कमी होत आहे. परंतु या खेळात मानवाचा शारीरिक व मानसिक विकास होऊन शरीरयष्टी सुदृढ बनवते आणि यातूनच जिद्द चिकाटी धैर्य ही गुण निर्माण होऊन युवक घडतो एक ग्रामीण क्षेत्रातील खिलाडी उदयास येतो तेव्हा ग्रामीण भागात अश्या स्पर्धाचे आयोजन करायलाच पाहिजे तेव्हाच एक खेळाडूंवृत्तीची पिढी निर्माण होईल आणि त्यामुळेच अश्या स्पर्धा ग्रामीण क्षेत्रातील युवकांना वरदान ठरतील असे प्रतिपादन घनश्याम डुकरे यांनी मालेवाडा येथील पुरुषांच्या भव्य कबड्डी स्पर्धांच्या उदघाटन सोहळ्यात केले.

.          मालेवाडा येथे मित्र परिवार क्रीडा मंडळ मालेवाडा यांच्या सौजन्याने दि 23 आणि 24 नोव्हेंबर ला पुरुषांच्या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. याच वर्षी अनेक संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याला चिमूर कु उ बा समिती चे संचालक घनश्याम डुकरे तर उदघाटक म्हणून सरपंच दिक्षा पाटील उपस्थित होत्या.
दि 24 ला या स्पर्धेचे समारोप झाले असून विजेत्या संघाला बक्षिसे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या लोमदेव क्रीडा कालेज मांढळ प्रथम तर न्यु बाल गणेश मंडळ कन्हाळगाव द्वितीय तर जय गुरू क्रीडा मंडळ पांजरेपार तृतीय व न्यु यंगस्टार क्रीडा मंडळ कोरा याना चथुर्थ क्रमांक घेऊन यश प्राप्त केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला ता उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती आघाडी चिमूर शैलेंद्र पाटील, भाजपा युवा नेते हर्षल डुकरे, सरपंच कालिदास भोयर, शंकर दडमल उपसरपंच प्रमोद जिवतोडे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.