Home राजकीय माजी सरपंच जूनघरे यांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश

माजी सरपंच जूनघरे यांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश

843

वरोरा 

.           तालुक्यातील आबमक्ता विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जूनघरे व संचालक महादेव पेचे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्याला प्रेरित होऊन जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात उपनेते मनोज जामसुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेतला.

.           शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या धर्तीवर जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्षाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य मदत तसेच दिव्यांगांना तीन चाकी सायकलचे वाटप व समाजातील गोर-गरीब, शेतकरी, शेतमजुर आणि समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर असतात.

.           त्यांच्या या कार्याला प्रेरित होऊन तालुक्यातील आबमक्ता विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जुनघरे व संचालक महादेव पेचे यांनी शिवसेना उपनेते कामगार नेते तथा माजी नगरसेवक मनोज जामसुतकर व मुंबई भायखळा संघटक सूर्यकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात शिवदूत बंडू डाखरे यांच्या सहकार्याने शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमित निवड विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, युवा सेना जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ खापणे, व समस्त पदाधिकारी, शिवसैनिक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!