भद्रावती
. अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी द्वारे टाकळी-जेना-बेलोरा नॉर्थ व साऊथ खुल्या भूमिगत कोळसा खाणीकरिता भद्रावती तालुक्यातील पानवडाळा, टाकळी, जेना, बेलोरा, कढोली, किलोनी, कांसा व डोंगरगाव (खडी) या गावातील सुमारे 936 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून ही कंपनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना व अन्य बाधित नागरिकांना न्याय देईल असा विश्वास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त करीत अरबिंदो कंपनीने न्यायपूर्ण भूमिकेतून कार्य करावे. अशी अपेक्षा प्रकल्प पीडीत शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद व चर्चा करताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. येथे प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेमुळे 15 ऑक्टोबरला सर्व गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची चर्चा करून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
. याप्रसंगी रमेश राजूरकर, धनंजय पिंपळशेंडे, नरेंद्र जीवतोडे, अंकुश आगलावे, प्रशांत डाखरे, सरपंच प्रदीप महाकुलकर, मनीषा तुराणकर, प्रभा बोधाले, उपसरपंच डुकरे, आकाश वानखडे, विशाल दुधे, नितीन चालकुरे, ईश्वर उताने, प्रदीप मांडवकर आदी उपस्थित होते. यामध्ये कंपनीने 936 हेक्टर जमीन एकमस्त घेऊन प्रत्येक सातबारा वर नोकरी द्यावी, जमिनी पोटी कंपनीने दिलेला प्रति एकर दर वाढवून द्यावा, कामगारांना मिळणारे वेतन उच्चाधिकार समितीच्या निर्णयानुसारच मिळाले पाहिजे, ग्रामस्थांची पुनर्वसनाबाबतची भूमिका यावर अहिर यांनी मार्गदर्शन केले. या सभेला प्रकल्पग्रस्त गावातील महिला पुरुष व युवक बहुसंख्येने उपस्थित होते.

