भद्रावती
. ग्रामपंचायत,जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व आरोग्य विभाग चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चंदनखेडा येथे “वाचन प्रेरणा दिन” व ” जागतीक हातधुवा दिन” निमित्त प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम घेण्यात आला.
. याप्रसंगी सरपंच नयन जांभुळे, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अनिल कोकुडे, मुख्याध्यापिका अनिता आईंचवार, कवडु बोढे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अंगणवाडी स्वयंसेविका राखी मुडेवार, वैशाली ढोकयांनी हात धुण्याच्या सहा टप्प्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांद्वारा सोबत स्वतः करुन दाखविले.
. यावेळी नयन जांभुळे सरपंच यांनी स्वच्छतेच्या सवयी आपले जिवनमान उंचावण्यासाठी कारणीभुत ठरत असतात म्हणून प्रत्येक बालकांनी आपल्या कुटुंबातील सर्वांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी स्वतःपासून सुरवात करावी व हा दिवस घराघरातून रोजचा उपक्रम बनावा असे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिल कोकुडे, अनिता आईंचवार यांनी “वाचन प्रेरणा दिन” यावर वाचनाचे महत्व पटवून दिले. वाचनालयातील पुस्तकाचे नियमित वाचन करण्यासाठी आवाहन केले. डाँ.ए.पि.जे.अब्दुल कलाम यांचे जिवनातील महत्वाचे प्रेरणादायी टप्पे शाळेचे शिक्षक पंडीत लोंढे यांनी आपल्या सुत्रसंचनासोबत विद्यार्थ्यांना सांगुन वाचना विषयी प्रेरीत केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वेदिका निखार या विद्यार्थीनीने केले.


